वरणगाव,(अंकुश गायकवाड):-कोरानाच्या विषाणूची दस्तक शहराच्या दोन्ही बाजुला येवून ठेपली आहे. याला एकच उपाय म्हणजे सर्वांनी घरात बसणे व सोशल डिस्टन्स पाळणे हेच ओळखून वरणगाव शहरातील पालिका, पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने दोन दिवसाच्या लॉक डाऊनचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मंगळवारचा आठवडा बाजार असल्याने हा निर्णय योग्य वेळी घेतला असून शहरातील नागरीकांनी पहिल्याच दिवशी शंभर टक्के सहभागी होवून एकजुटीने कोरोनाच्या लढाईत उतरले आहे.
शहरात मंगळवारला आठवडे बाजार असतो. या ठिकाणी शहरासह सत्तावीस खेड्यातील नागरीक बाजारा निमित्त येत असतात. तर व्यावसायीक देखील तालुका भरातून येत असतात. वारंवार सुचना देवून देखील सोशल डीस्टन्स पाळले जात नाही. त्यात वरणगाव शहराच्या एका बाजुला भुसावळ व दुसऱ्या बाजुला मुक्ताईनगरात कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले. यामुळे मंगळवारच्या आठवडे बाजारामुळे परिस्थीती बीघडू नये यासाठी सर्वांनी एकमताने दोन दिवस 48 तासाचा जनता कर्फ्यु पाळण्याचे ठरले. यासाठी प्रशासनाने कंबर कसली. या लढाईत व्यापारी संघटना, भाजीपाला विक्रेते, इतर जीवनावश्यक वस्तूचे दुकानदार यांचा सहभाग महत्वपूर्ण ठरला असुन याला साथ शहरातील नागरीकांनी दिली आहे. महत्वपूर्ण निर्णयाने वरणगावकर यांनी एकजुटीचे दर्शन सकाळपासून दाखवले असून अशीच एकजूट उद्या रात्री पर्यंत गरजेची आहे लढाईत यशस्वी होणार असल्याचा विश्वास वरणगावकरांनी दाखविला असुन विषाणूच्या संसर्गाला आळा घालणार आहेत.
यासाठी सकाळपासूनच वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार बोरसे, हर्षल भोये, नगराध्यक्ष सुनील काळे, मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी, स्वच्छता अभियंता गणेश चाटे दिपक भंगाळे व दीपक मराठे,राजू गायकवाड, संजय कोळी, कृष्णा कोळी, महेंद्र तायडे,पोलीस कर्मचारी, ए. एस. आय.सुनील वाणी,अतुल बोदडे,जावेद शेख,आदींनी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून चौख नियोजन केले. तसेच महामार्गावर जाणाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई करत दंड देखील वसूल केला आहे.
मेडीकलची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. काही नागरीक विनाकारण बाहेर पडले होते. त्यांना पोलीसांनी प्रसाद तर दिलाच परंतु त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे. शहरात पालीका कर्मचारी फीरून सुचना देत आहेत. तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नका अशा सुचना देखील देताना दिसुन आले.या दंडात्क कारवाईमुळे पालीकेने आतापर्यंत दंड वसुल केला आहे.
महत्वपूर्ण निर्णय ठरला
शहरात मंगळवार हा आठवडे बाजाराचा दिवस असतो. यामुळे बाजारासाठी व्यावसायीक व ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.दंडात्मक कारवाई व सुचना देवूनही काही व्यावसायीक व नागरीक ऐकत नाही. सोशल डीस्टन्स चे नि्यम पाळत नाही. परंतु मंगळवारपासून दोन दिवस लॉक डाऊनचा निर्णय महत्वपूर्ण ठरला आहे. यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो.
नागरीकांच्या आरोग्यासाठी निर्णय लॉक डाऊन हा निर्णय कटु आहे. तसेच हातावर पोट असणाऱ्यांची जाणीव आहे. परंतु आजुबाजुला कोरानाचा होणारा प्रार्दुभाव बघता शहरातील नागरीकांच्या आरोग्यासाठी हा कटु निर्णय घेणे गरजेचे होते. यासाठी व्यापारी संघटना, भाजीपाला विक्रेते , जीवनावश्यक वस्तू विक्रेते व नागरीकांनी सहकार्य केल्याने शक्य झाले आहे. सुनिल काळे,नगराध्यक्ष
वरणगाव शहर सुरक्षीत ठेवण्यासाठी निर्णय
सुदैवाने आपण सुरक्षीत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव वाढत आहे. यासाठी एकमेव उपाय म्हणजे सोशिअल डीस्टन्स आहे. भुसावळ शहरात परिस्थीती बघता काही भाग कंन्ट्यामिनिटेड करावा लागला आहे. सदरची परिस्थीती वरणगाव शहरावर येवू नये यासाठी प्राथमिक उपाययोजना म्हणुन लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. श्यामकुमार गोसावी, मुख्याधिकारी.