जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात यापुढे “कॉन्टाईनमेंट झोन” जाहीर झाल्यानंतर बँकांचे व्यवहार ग्राहकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी जारी केले आहे.
यापुढे प्रशासनाच्या वतीने जळगाव जिल्यातील ज्या भागाला “कॉन्टाईनमेंट झोन” जाहीर केले जाईल त्या भागातील बँकांचे व्यवहार ग्राहकांसाठी बंद करण्यात येतील मात्र बँकांचे सर्व अंतर्गत व्यवहार सुरु रराहणार आहे.
“कॉन्टाईनमेंट झोन” जाहीर झालेल्या परिसरातील बँकांनी ग्राहकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा पुरवाव्यात तसेच ग्राहकांना घरपोच बँक मित्र, पोस्ट खात्या मार्फत सुविधा देखील पुरवण्याकामी प्राधान्यक्रम द्यावा असेही सुचविले आहे.
तसेच “कॉन्टाईनमेंट झोन” मध्ये येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांनी माक्स चा वापर करत बँकेत हात धुण्यासाठी सॅनिटायझर, हँडवॉश ची व्यवस्था करावी असे आदेश जारी झाले असून उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद आहे.