रायसोनीबिजनेस मॅनेजमेटमहाविद्यालयाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविले सुरक्षित “थ्रीडीप्रिंटेड फेसमास्क”
जळगाव,(प्रतिनिधी) : आज संपूर्ण जग कोविड १९ सारख्या भीषण संसर्गजंन्य रोगा सोबत लढत आहे, बहूतेक देश आणि संस्था या संसर्गापासुन वाचविण्यासाठी विविध प्रकारचे उत्पादणे बणवत आहे आणि नवनविन संशोधन करीत आहे. आता हे सर्वाना कळून चुकले कि कोरोना हा संसर्गाने पसरतो त्यामुळे कोरोनाची लागण रोखन्यासाठी फेस मास्क लावणे हा सर्वात चांगला उपाय असल्याने शासनाने प्रत्येकाला मास्क अनिवार्य केले आहे . कोणताहि फेस मास्क हा हवेला न रोखणारा, श्वसन प्रक्रियेत अडथळे निर्मान न करनारा, समोरिल व्यक्तिने शिंकताना उडनारे लाळेचे कण रोखणारा असला पहिजे. आताची परिस्थीती पाहता मास्कची मागणी ज्यास्त असल्यामुळे संरक्षण किटची सर्वांना पूर्तता होणे आता कठिण दिसत आहे. त्यामुळे सर्व समस्या लक्षात घेता उपलब्द संसाधान व साहित्या मधून जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांञीकी महाविद्यालयातील यंञ अभियांञीकी शाखेच्या विद्द्यार्थींनी प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू तसेच यंञ अभियांञीकी शाखेचे विभाग प्रमूख डॉ. नितीश सिन्हा आणि प्रा. दत्ताञय चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखराज वाघ, सुशिल महाजन, दामोदर जिवराजनी, शुभम सोनवने आणि शिवम कुलकर्णी या विद्द्यार्थींनी अत्यंत कमी वेळेत तंञज्ञानाचा उपयोग करुन उत्क्रुष्ठ दर्जाचे कोविड १९ पासून सुरक्षा देणार्या फेस मास्क चे डिझाईन करुण निर्मीती केली आहे .
एका थ्रीडी मास्कला ७० रुपये इतका खर्च येत असून कोविड १९ पासून सुरक्षा देणार्या या फेस मास्क चे डिझाईन CATIA सॉफ्टवेअर मधे मानवि चेहरा लक्षात घेऊन करण्यात आले. त्या नंतर याला तंञज्ञानाचा उपयोग करुण थ्रीडी प्रिंटिंग मशिन ला उपयोगी अशा भाषेत रुपांतर करुन त्याची यंञ अभियांञीकी विभागाचे उत्कृष्टतेचे केंद्र (Center of Excellence) येथे उच्च तंञज्ञानाने थ्रीडी प्रिंटिंग मशिनवर निर्मीती केली. त्या नंतर या फेस मास्क ला High Efficiency Particulate Air (HEPA) फिल्टर आणि बांधायला ईलास्टिक लावण्यात आले.मास्क मधे लावण्यात आलेले हेपा फिल्टर हे ९९.९९६% पर्यत ०.३ मायक्रॉण आणि त्या पेक्षा मोठे कण अडवण्यासाठी उपयोगी ठरत आहे. आतापर्यत झालेल्या संशोधनातून समोर आले आहे कि शिंकताना १.० मायक्रॉण इतक्या छोट्या कणा पासून कोविड १९ होवू शकतो. त्यामुळे रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांञीकी महाविद्यालयाने निर्मित केलेले थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क सर्वांना उपयुक्त ठरणार आहे. सदर उपक्रमाचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले आहे.