बोदवड,दि. (सचिन पाटील)-येथील अग्रवाल सुपर शॉप ने लॉकडाऊनचे नियम मोडीत शासनाने दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ शॉप सुरु ठेऊन दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेऊन सायंकाळी 6:30 पर्यंत उशिरा किराणा माल विक्री केल्याचे आढळून आले.
शहरातील किराणा दुकानांना लॉकडाऊन काळात सकाळी 11ते 5 वेळ दिलेली असतानाही वेळेची मर्यादा न पाळता लॉकडाऊन काळातही नियमांचे उल्लंघन करत दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेवत ग्राहकांना किराणा माल विकत असल्याचे आज दिसून आले.याकडे प्रशासनाने लक्ष देऊन लॉकडाऊन पाळण्याबाब स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.