Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकच्या मुख्य अभियंत्याकडून विकासकामांच्या प्रस्ताव मंजुरीला खीळ !

आ.राजुमामा भोळेंसह आ.किशोर पाटलांची नाराजी ना. महाजन, ना. पाटलांनी ‘जोर लावण्याची’ अपेक्षा

najarkaid live by najarkaid live
December 14, 2022
in जळगाव
0
सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकच्या मुख्य अभियंत्याकडून विकासकामांच्या प्रस्ताव मंजुरीला खीळ !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता आवटी यांच्याकडे जळगाव विभागातून मंजुरीसाठी गेलेल्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरीसाठी मुख्य अभियंता नाशिक यांच्याकडे कागदपत्रे पाठविली जातात. या कामांच्या प्रस्तावाला वेळीच मंजुरी न देता विकास अकारण खीळ घालत फाईल्स थांबविण्याचा अजब प्रकार मुख्य अभियंता (नाशिक) यांच्याकडुन होत असल्याने आ. राजुमामा भोळे व पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार श्री.आवटी यांच्याकडे आहे. आवटी यांच्याकडे नियमित पदभार मुंबई विभागाचा आहे. त्यामुळे त्यांना नाशिक विभागाच्या कामांना न्याय देता येत नाही. नाशिक विभागात नाशिक , नगर, जळगाव, धुळे, नंदूरबार या पाच जिल्ह्यातील विकास कामांच्या प्रस्ताव मंजुरीच्या कामाचा त्यांच्या अखत्यारीत समावेश आहे.

दरम्यान, ‘नजरकैद ’ प्रतिनिधीने आ. राजुमामा भोळे यांच्याशी संपर्क साधला असता आ. चंदुभाई पटेल व माझ्या कामांच्या प्रस्तावांना वेळीच मंजुरी न दिल्यामुळे कामे रखडली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाभरातील विकासकामांचे अनेक प्रस्ताव मुख्य अभियंता (नाशिक) यांच्याकडे नेहमी जातात. मुख्य अभियंता (नाशिक) यांच्याकडे प्रभारी पदभार असल्याने कामे वेळीच करण्यासाठी ते अकार्यक्षम असल्याचेही या आमदारांनी सांगितले. मुख्य अभियंता (नाशिक) यांना जिल्ह्यातील ना. गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील या वजनदार मंत्र्यांनी वेळीच सूचना देवून विकासकामांच्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देणेसंबंधी सूचना कराव्यात, जेणेकरुन विकासकामांना मंजुरी मिळून विकासकामे तात्काळ मार्गी लागतील, अशी मागणी आमदारांसह जनतेकडून होत आहे.

मुख्य अभियंता (नाशिक) यांच्याकडे नाशिक विभागाचा अतिरीक्त पदभार आहे. त्यांच्याकडून कामे वेळेत होत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींचीही तीव्र नाराजी त्यांच्यावर आहे. अशी परिस्थिती असतांनाही काही विशिष्ट कामांच्या मागील पाच वर्षाआधी झालेल्या काही विशिष्ट कामांची पाहणी करुन दक्षता व पुर्ननियंत्रण समिती (नाशिक) यांना पत्रव्यवहार करुन स्थानिक अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा त्यांचा फंडा नेमका कशासाठी आहे ?, असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

ना. गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील यांनी वेळीच या गंभीर विषयाची दखल घेत मुख्य अभियंता (नाशिक) यांना जाब विचारला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील कामांच्या तपासणीच्या मुख्य अभियंता (नाशिक) यांच्या पत्रव्यवहाराने स्थानिक अधिकाऱ्यांचा कामातील महत्त्वाचा वेळ अकारण कागदपत्रे गोळा करण्यात जात असल्याने विकास कामांच्या इतर बाबींना खीळ बसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरुणांनो.. शेतीमध्ये नशीब आजमावताय? मग ‘या’ 5 संधी करतील तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित

Next Post

एरंडोल शहरात ५१ जणांवर वीजचोरीच्या कारवाईने खळबळ !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
एरंडोल शहरात ५१ जणांवर वीजचोरीच्या कारवाईने खळबळ !

एरंडोल शहरात ५१ जणांवर वीजचोरीच्या कारवाईने खळबळ !

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us