Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील कलावंत व नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा,१४ जानेवारी पासून होणार सुरु ; २ लाखापर्यंतची पारितोषिके मिळणार

najarkaid live by najarkaid live
December 27, 2023
in जळगाव
0
राज्यातील कलावंत व नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा,१४ जानेवारी पासून होणार सुरु ; २ लाखापर्यंतची पारितोषिके  मिळणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नाट्यसंस्कृतीची पंढरी असलेल्या संपूर्ण राज्यात जानेवारी २०२४  ते मे २०२४ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने व्यापक स्वरुपात साजरे करणार आहे. या संमेलनाच्या महत्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत व नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दि. १४ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. या महोत्सवात सर्व कलावंतांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रावर होणाऱ्या या नाट्यकलेचा जागर अंतर्गत जळगाव जिल्ह्यातदेखील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे एकांकिका स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अशा तीन फेऱ्यात होणार आहे.

१४ जानेवारीपासून प्राथमिक फेरी सुरु होवून यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यशाळेत नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेनंतर अंतिम फेरीतील संघांच्या सादरीकरणाचा दर्जा सर्वोत्तम असणार आहे.
व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व हौशी गुणवंत कलावंतांना शतक महोत्सवी नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागर महोत्सवातून मिळणार आहे.

या स्पर्धात एकांकिका स्पर्धेत खास स्पर्धेसाठी लिखाण केलेल्या एकांकिकेस सर्वोत्कृष्ट रु. दोन लाख अथवा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ एकांकिकेस रु.एक लाख, उत्कृष्ठ एकांकिकेस रु.७५ हजार, उत्तम एकांकिकेस रु.५० हजार व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रु.२५ हजार देण्यात येणार आहे. बालनाट्य स्पर्धेतील बालनाट्यांना सर्वोत्कृष्ट रु.७५ हजार, उत्कृष्ट रु.५० हजार, उत्तम रु.२५ हजार तर तीन उत्तेजनार्थ रु.१० हजारांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
नाट्य अभिवाचन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रु.२५ हजार, उत्कृष्ट रु.१५ हजार, उत्तम रु.१० हजार व दोन उत्तेजनार्थ रु.५ हजार आणि नाट्यसंगीत पद गायन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रु.२५ हजार, उत्कृष्ट रु.१५ हजार, उत्तम रु.१० हजार व दोन उत्तेजनार्थ रु.५ हजार पारितोषिके देण्यात येणार आहे. एकपात्री/नाट्यछटा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रु.१५ हजार, उत्कृष्ट रु.१० हजार, उत्तम रु.५ हजार, दोन उत्तेजनार्थ रु.अडीच हजार या पारितोषिकांसोबतच एकांकिका व बालनाट्य स्पर्धेसाठी लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, स्त्री अभिनय, पुरुष अभिनयाची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एकांकिका स्पर्धेसाठी प्रवेश फी रु.१ हजार व बालनाट्यासाठी रु.५०० व इतर स्पर्धांसाठी रु.१०० राहणार आहे. ही प्रवेश फी व प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावयाचे असून, त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या वेबसाईटवर लिंक देण्यात आली आहे. प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२३ आहे.

नाट्यकलेचा जागर या स्पर्धा महोत्सवात जळगाव केंद्रासाठी केंद्रप्रमुख योगेश शुक्ल (९६५७७०१७९२), सहयोगी प्रमुख ॲड.संजय राणे, शरद पांडे ,  प्रा.शमा सराफ, पद्मनाभ देशपांडे (99231 38006), चिंतामण पाटील (8275709465), संदीप घोरपडे (94222 79710), प्रा. प्रसाद देसाई (9371688861), प्रा.स्वप्ना लिंबेकर – भट (7030545342) यांचेशी संपर्क करावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी नाट्यसंस्था, विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे, नाट्यजागर विभाग प्रमुख श्री शिवाजी शिंदे,  मध्यवर्ती शाखा सदस्य गितांजली ठाकरे आणि कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उच्च न्यायालयाचा निर्णय ; अखेर राज्य लोकसेवा आयोग – एमपीएससीच्या १२ जाहिरातीं नुसार झालेल्या भरतीचा मार्ग मोकळा

Next Post

माजी उपनगराध्यक्षासह युवासेना उपजिल्हाप्रमुखाची शिवसेनेत घरवापसी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
माजी उपनगराध्यक्षासह युवासेना उपजिल्हाप्रमुखाची शिवसेनेत घरवापसी

माजी उपनगराध्यक्षासह युवासेना उपजिल्हाप्रमुखाची शिवसेनेत घरवापसी

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us