जळगाव,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ पाहायला मिळाल्या असून कालच भाजपातून राष्ट्रवादी पक्षात आलेले महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून स्वगृही परतणार असल्याचं त्यांनी स्वतः मीडियाला सांगितलं आहे, खडसेंचा भाजपा पक्षप्रवेश येत्या एक दोन दिवसात भजपाच्या केंद्रीय नेतृत्वात होण्याची शक्यता आहे.दरम्यान भाजपा पक्ष प्रवेशानंतर खडसे यांच्याकडे राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.

८ एप्रिल रोजी भाजपा प्रवेशाचा मुहूर्त?
आज किंवा उद्या ८ एप्रिल सोमवार रोजी खडसेंच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती आहे. 8 एप्रिलला एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे भाजप प्रवेश झाल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपालपद दिलं जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी देण्यात आली.










