जळगाव,(प्रतिनिधी)- अखेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आ.एकनाथराव खडसे भाजपात प्रवेश करणार असून याबाबत खुद्द एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितलं मात्र आज प्रवेश नाही असं ‘नजरकैद’ शी बोलतांना सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या मीडियातून येत असतांना आज एकनाथ खडसे यांनी खुद्द भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.










