Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा – भडगाव विधानसभेसाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे किशोर आप्पा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

najarkaid live by najarkaid live
October 3, 2019
in जळगाव
0
पाचोरा – भडगाव विधानसभेसाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे किशोर आप्पा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

  • भाजपा शिवसेनेला जातीवादी ठरविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा धर्मनिरपेक्षतावाद खोटा – शिवाजीराव ढवळे
  • शहरातील बाजार पट्टा येथे जाहीर सभेनंतर बैलगाडी वरून रॅलीद्वारे दाखल केली उमेदवारी.

पाचोरा:- आदिवासी आणि बहुजन समाजात भाजपा-शिवसेना विषयी जातीयवादाचे विष पेरणारे काँग्रेसी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने जातीवादी असून त्यांची धर्मनिरपेक्षता ढोंगी आहे. सत्ता संपादन करण्यासाठी भोळ्या आणि गरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत काँग्रेसी नेत्यांनी आदिवासींचा केवळ सत्तेसाठी वापर करून घेतला आहे मात्र भाजप-शिवसेनेच्या राज्यकर्त्यांनी माझ्यासारख्या आदिवासी ऊस तोड कामगाराचा मुलाला राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे .हा खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय असून माझ्यासारख्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांना काम करण्याची योग्य संधी दिली आहे.

आदिवासी व बहुजन समाजातील मतदार बांधवांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे अध्यक्ष म्हाडा संस्थेचे प्रमुख शिवाजीराव ढवळे यांनी केले. शिवसेनेचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या प्रचार सभेला संबोधित करताना त्यांनी हे विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे खासदार उमेश पाटील माजी मंत्री अब्दुल सत्तार माजी आ चिमणराव पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील उपाध्यक्षा प्रा.अस्मिता पाटील उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील. भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील जिप सदस्य मधुकर काटे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील सोमनाथ पाटील भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील पंस सभापती बन्सी पाटील शेतकरी सेनेचे अरुण पाटील नगराध्यक्ष संजय गोहिल मुकुंद अण्णा बिलदिकर ॲड. दिनकर देवरे गणेश पाटील रावसाहेब पाटील भुरा आप्पा पाटील विकास तात्या पाटील राजेंद्र पाटील यांचेसह शिवसेना-भाजप आरपीआय महायुतीचे मान्यवर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवसेना महायुतीचे उमेदवार आ किशोर आप्पा पाटील यांनी दुपारी अडीच वाजता पाचोरा विभागाचे प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी शहरातील बाजार पट्टा भागातील मारुती मंदिराच्या समोरील पटांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या सभेला संबोधित करताना आमदार किशोर पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेत त्यांनी केलेल्या विकासकामांची आठवण करून दिली. प्रसंगी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विकासात्मक धोरणांचा गौरवोद्गार काढत भविष्यकाळात करणार असलेल्या विकासकामांचा संकल्प सांगितला. यावेळी भाजप खा. उन्मेष पाटील यांनी भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना युतीचा धर्म प्रामाणिक पाळण्याचे आव्हान करून शिवसेनेने लोकसभेच्या काळात केलेल्या मदतीची परतफेड करण्याचे आवाहन यावेळी केले.प्रसंगी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलताना जनतेने हिंदू-मुस्लिम भेद न करता शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांना प्रचंड मताधिक्‍याने विजयी करा असे आवाहन मुस्लिम समाज बांधवांना केले.यासभेत भाजपचे जिप सदस्य मधुकर काटे सदाशिव पाटील सुभाष पाटील प्रा अस्मिता पाटील डॉ संजीव पाटील कांतीलाल जैन आरपीआयचे एसटी सावळे शिवसेनेचे गणेश परदेशी यांनी समयोचित बोलताना भाजपा-शिवसेना युतीच्या शासनाने केलेल्या जनकल्याणकारी विकास कामांची माहिती करून मतदारांना साकडे घातले. यावेळी आमदार किशोर पाटील यांच्या् सुकन्या डॉ सुप्रिया पाटील यांनी उपस्थितांना भावनिक साद घालून मतदानाचे आवाहन केले.जाहीर सभेनंतर आ किशोर आप्पा पाटील यांनी बैलगाडीवर स्वार होत समर्थकांसह प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

रॅलीमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील शहर प्रमुख किशोर बारावकर बंडू चौधरी रवि केसवानी बापू हटकर डॉ भरत पाटील दादाभाऊ चौधरी संदीप राजे वैभव पाटील जितेंद्र पेंढारकर योगेश पाथरवट डॉ.शेखर पाटील विजूू पाटील यासह बैलगाडीच्या सौ सुनिता पाटील सौ तीलोत्तमा मौर्य सौ वंदना पाटील यांचेसह मोठ्या संख्येने शिवसेना महायुतीचे समर्थक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर मतदार संघातून शिरीषदादा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Next Post

बोदवड जेडीसीसीत पाऊणे तीन लाखांचा अपहार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
बोदवड जेडीसीसीत पाऊणे तीन लाखांचा अपहार

बोदवड जेडीसीसीत पाऊणे तीन लाखांचा अपहार

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us