पाचोरा – मा उच्च न्यायालय, विधी सेवा समिती, औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव यांचे आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकिल संघ पाचोरा यांचे संयुक्त विद्यामाने मोबाईल व्हॅन पाचोरा न्यायालयात विधी सेवा बाबत जनजागृती करनेकामी दोन दिवसाकरीता दाखल झाली आहे. दि. २४-०४-२०२४ रोजी पाचोरा न्यायालयात या प्रसंगी श्रीमती एम. जी. हिवराळे मॅडम, सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश पाचोरा यांनी मोबाईल व्हॅनची पुजा करुन हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले व मोबाईल व्हॅन पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत साराेळा खुर्द येथे रवाणा झाली होती.
तदनंतर ग्रामपंचायत, सारोळा खुर्द ता पाचोरा येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमात श्रीमती एम. जी. हिवराळे, सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश पाचोरा, विधीज्ञ प्रविण बी. पाटील, अध्यक्ष पाचोरा वकील संघ विधीज्ञ मंगेश गायकवाड, उपअध्यक्ष, विधीज्ञ निलेश सुर्यवंशी, विधीज्ञ अंबादास गिरी, सौ. सिमा शिवदास पाटील, सरपंच हे मंचावर उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस वकिल संघाचे अध्यक्ष विधीज्ञ प्रविण बी पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये लोक न्यायालयाचे महत्व स्पष्ट केले. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या शिबीरात विधीज्ञ श्री शांतीलाल सैंदाणे यांनी चाईल्ड लेबर, विधीज्ञ श्री जि. डी. पाटील यांनी चाईल्ड बेगीग, विधीज्ञ श्री सुधाकर पाटील यांनी चाईल्ड ट्राफिकिंग, विधीज्ञ श्री सुनील पाटील यांनी पब्लीक युटीलीटी सर्वीसेस या विषयांवर गावक-यांना मार्गदर्शन केले.
शेवटी अध्यक्षीय भाषण करतांना श्रीमती एम. जी. हिवराळे, सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश यांनी लोकन्यायालयाचे फायदे स्पष्ट केले. तसेच यामुळे आपला वेळ, पैसा, नाती हे कसे जिवंत राहतात हे सांगीतले.
यावेळी पाचोरा वकिल संघाचे जेष्ठ विधीज्ञ विधीज्ञ एस.बी. माहेश्वरी, विधीज्ञ डी. आर. पाटील, विधीज्ञ मदन मोरे, विधीज्ञ दिपक पाटील, विधीज्ञ अनुराग काटकर, विधीज्ञ पी. बी. पाटील, विधीज्ञ संजीव नैनाव, विधीज्ञ राजेंद्र परदेशी, विधीज्ञ व्ही. ए. पाटील, विधीज्ञ वहाब देशमुख, विधीज्ञ अरुण भोई, विधीज्ञ नाना महाजन, विधीज्ञ चंदन राजपुत, विधीज्ञ कैलास सोनवणे, विधीज्ञ राजेंद्र पाटील, विधीज्ञ प्रशांत नागणे, विधीज्ञ संदीप पाटील, विधीज्ञ ईश्वर जाधव, विधीज्ञ एन. आर. बोरसे, विधीज्ञ करुनाकर ब्राम्हणे, विधीज्ञ अविनाश सुतार, विधीज्ञ प्रदिप सुर्यवंशी तसेच महिला वकिल भगीनी विधीज्ञ कविता मासरे (रायसाकडा), विधीज्ञ भाग्यश्री महाजन, विधीज्ञ प्रियंका न्याती, विधीज्ञ माधुरी जाधव, विधीज्ञ चंचल पाटील व पाचोरा वकील संघातील ज्युनीअर व सिनीयर मंडळी, न्यायालयीन कर्मचारी यांनी लोकन्यायालयाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन विधीज्ञ मंगेश गायकवाड व आभार प्रदर्शन विधीज्ञ निलेश सुर्यवंशी यांनी केले. सदरील फिरते लोकन्यायालयात *एकुण ठेवण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी २० प्रकरणांपैकी १५ प्रकरणांचा निपटारा होवुन एकुण रक्कम रु ४३,३०,०००/- एवढी वसुली झाली.*
तसेच दि. २५/०४/२०२४ रोजी सावखेडा येथे फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.










