Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निर्मळ मन आणि सहनशीलतेचे धनी नानासाहेब प्रतापराव हरी पाटील 

najarkaid by najarkaid
September 27, 2020
in जळगाव
0
निर्मळ मन आणि सहनशीलतेचे धनी नानासाहेब प्रतापराव हरी पाटील 
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव :(राकेश पाटील)-  शिक्षणाचे महामेरु भडगाव तालुक्यातील आमडदे येथिल रहिवासी नानासाहेब प्रतापराव हरि पाटील यांचा आज वाढदिवस निमित्ताने …

एक शांत , संयमी , हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना परिचीत आहेत. भडगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे ते विदयमान चेअरमन आहेत . संस्थेचे एक छोटेसे रोपटे त्याचा आज झालेला विशाल वटवृक्ष बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे .
व्यक्तिचे मन शुध्द असले की त्या व्यक्तिचा कोणीही शत्रु होवू शकत नाही . सर्वांनाच चांगल्या मनाच्या व्यक्तिशी मैत्री करावीशी वाटते . असे निर्मळ मनाचे व्यक्तिमत्व म्हणजे नानासाहेब . निर्मळ मना बरोबरच सहनशीलता त्यांच्या अगदी रोमारोमात भरलेली दिसते . म्हणूनच त्यांना निर्मळ मन आणि सहनशीलतेचे धनी म्हंटले जाते .राजकारण आणि समाजकारण यामध्ये अतिशय उत्कृष्ठ कार्य करून त्यांनी आपल्या कामाचा एक आगळावेगळा ठसा जनमाणसात उमटविलेला आहे . अल्पावधीतच एक चांगला लौकीक प्राप्त करुन समाजात एक मानाचे , आदराचे स्थान त्यांनी मिळविलेले आहे .
कुणाचीही मदत करण्याची नेहमीच त्यांची तयारी असते . मागील कालावधीत केरळ पुरग्रस्तांना त्यांनी भरीव स्वरूपाची मदत केलेली होती . आता कोरोना सारख्या भयंकर संकटात देखिल त्यांचा मदतीचा हात सदैव तयारच असतो .सत्ता आणि संपत्तीचा हव्यास त्यांनी कधीच केला नाही . सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सतत निस्वार्थी काम करणारे नानासाहेब खरच एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचीत आहेत .कमी बोलणे आणि सर्वांना आपलेसे करणे हा स्थायी भाव त्यांच्या अंगी असल्यामुळे सर्वांना त्यांचे व्यक्तिमत्व मनापासून भावते .
किसान शिक्षण संस्थेचा वाढता व्याप , राजकारण आणि समाजकारण यातील दगदग सांभाळूनही नानासाहेब सर्वांशी प्रेमाने , हसतमुखपणे वागतात . स्वभावात आत्मीयता आणि आदर असल्यामुळे राग , द्वेष , मत्सर , चिडचिड या गोष्टी त्यांच्या आजुबाजुला अजिबात फिरकत नाही .
१९९८ पासून किसान शिक्षण संस्थेची जबाबदारी नानासाहेबावर सोपविलेली आहे . आजही ती जबाबदारी ते समर्थपणे पेलत आहेत . नविन स्वप्न उराशी बाळगून आणि भविष्याचा वेध घेऊन त्यांनी किसान शिक्षण संस्थेत अनेक कायापालट केलेले आहेत . मुलभुत दर्जेदार शिक्षण , संगणकीय प्रणालीचा पुरेपुर वापर , कर्मचारी आणि विदयार्थी हित या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन संस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवलेला आहे .
आज किसान शिक्षण संस्थेचा महाकाय वटवृक्ष तयार झालेला आहे . संपूर्ण महाराष्ट्रात किसान शिक्षण संस्थेने आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविलेला आहे .ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना आपण समाजाचेे काहीतरी देणे लागतो हि वृत्ती अंगाशी बाळगून सर्वांचे हित साधणाऱ्या नानासाहेबांच्या कार्याला आणि भावी वाटचालीला मनापासून सर्वांच्या शुभेच्छा ….

                                      लेख लिखाण …..

राकेश पाटील सर
टि .आर .पाटील विदयालय
वडजी ता .भडगाव.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यापीठात सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

Next Post

1 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात होणा-या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर

Related Posts

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Next Post

1 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात होणा-या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us