Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुणांनी मोठे अधिकारी होऊन समाजाचा व गावाचा नावलौकिक वाढवावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

najarkaid live by najarkaid live
July 22, 2024
in Uncategorized
0
तरुणांनी मोठे अधिकारी होऊन समाजाचा व गावाचा नावलौकिक वाढवावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील !
ADVERTISEMENT

Spread the love

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) तरुणाईने मोबाईल व्हाट्सअप फेसबुकच्या युगामध्ये जरूर वावरावे पण ज्यांचे बोट धरून आपण चालायला शिकलो व ज्यांच्या खांद्यावर बसून आपण जग पहायला शिकलो अशा आई-वडिलांचा आदर करणे, सन्मान करणे व त्यांच्या चेहऱ्यावर हसू – डोळ्यांमध्ये अभिमान निर्माण होईल असे कार्य करा. ज्या दिवशी बापाचे आव्हान स्विकाराल त्यानंतर ध्येयप्राप्ती निश्चित आहे. गुणवंत विद्यार्थी हे भविष्यातील तुफानाचे दिवे असून त्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गुरुजानांवर प्रचंड श्रध्दा व विश्वास ठेवा. त्या विश्वासातूनच आयुष्याची तहान भागणार असल्याचे प्रतिपादन व्याख्याते अविनाश भारती यांनी केले.

तर गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. मोबाईलच्या क्षणिक सुखाला बळी न पडता मोबाईलचा वापर हा गरजेपुरता झाला पाहिजे. तरुणांनी मोठे अधिकारी होऊन समाजाचा व गावाचा नावलौकिक वाढवावा. कुटुंब हे आपले देवालय असून त्यातील आई – बाबा हेच आपले साई बाबा आहेत असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर भाऊसो गुलाबराव पाटील फौंडेशन आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यांप्रसंगी ते बोलत होते.

गुरुजनांचा सन्मान – गुणवंतांचा सत्कार

गुरुपौर्णिमा निमित्त पालकमंत्री यांचे सेवानिवृत्त शिक्षक अशोक सोनार, गोपाळराव पंडीत, आत्माराम फुलपगार यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच धरणगाव व जळगाव तालुक्यातील दहावी, बारावीत प्रथम व द्वितीय आलेल्या सुमारे 178 विद्यार्थ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील व व्याख्याते अविनाश भारती यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1001 रु. अशा रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गुरू शिष्यांचा सन्माना प्रसंगी उपस्थित भारावले. कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन विक्रम (विक्की) पाटील यांचे व जीपीएस मित्र परिवारचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी व्याख्याते अविनाश भारती यांनी सांगितले की, पालकांनी मुलांना जे झेपेल तेच क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून आत्मविश्वास बाळगा. शिक्षकांच्या माराचे महत्व कमी झाल्याने शिस्त नावाचा प्रकार कमी झाल्याची खंतही व्यक्त केली. तहान लागली की, विहीर खोदणारे अनेक असतात. मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांचे सामाजिक कार्य महान असून ते फायर ब्रांड नेते असल्याचे सांगितले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांमधून कु. यामिनी जनार्दन कोळी व कु. नंदिनी सीताराम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली.

मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी भविष्यातही कष्ट, जिद्द व चिकाटी ठेऊन यश संपादन करण्याचे आवाहन करून सविस्तर माहिती विषद केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षिका ज्योती राणे व प्राचार्य नरेंद्र मांडगे सर यांनी केले तर भाऊसो गुलाबराव फाउंडेशनचे संचालक धनराज कासट यांनी आभार व्यक्त केले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले, सरला पवार, शाळेचे चेअरमन विक्रम (विक्की) पाटील, केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे, माजी सभापती ललिताताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, अनिल भोळे, पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, जनाआप्पा कोळी, माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, राजेंद्र चव्हाण, दूध संघाचे रमेशआप्पा पाटील, डॉ. कमलाकर पाटील, स्वप्नील परदेशी, जितेंद्र पाटील, संदीप सुरळकर, तुषार महाजन, अजय महाजन, योगेश सोनवणे, सुधाकर पाटील, तालुका संघटक रविंद्र चव्हाण सर, शहर प्रमुख विलास महाजन, गट नेते पप्पू भावे, युवा सेनेचे भैया मराठे, आबा माळी, गोपाल जीभाऊ , महिला आघाडीच्या शोभा ताई चौधरी, भारतीताई चौधरी, पुष्पाताई पाटील, नगरसेवक मनोज चौधरी यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज काळजातील पोलीस महासंचालक पुस्तकाचे प्रकाशन

Next Post

नंदगाव येथे पाण्याच्या टाकीचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us