जळगाव,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूक २०२४ करिता आज दिनांक १३ रोजी जळगाव जिल्ह्याचा राज्यात ११ मतदार संघात तर देशभरात ९३ मतदारसंघात मतदान होतं असून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन व पत्नी ज्योती जैन यांनी सकाळी ७ वाजता ओरियन स्कुल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे, यावेळी अशोक जैन यांनी आम्ही मतदानाचे कर्तव्य बजावले आपणही मतदान करून लोकशाही बळकट करूया असं आवाहन जिल्हावासियांना केले आहे.
लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. मत आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असून प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. आज जळगाव व रावेर लोकसभा निवडणूक करिता मतदान होतं असून सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत मतदान करता येणारं आहे.










