जळगाव,(प्रतिनिधी): गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री असून सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही, पोखरा योजनेत जळगाव जिल्ह्याचा समावेश केला नाही,शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळाले नाही, गिरणा बलून बंधाऱ्यासाठी निधी मिळवू शकलेले नाहीत. कॅबिनेटमध्ये त्यांनी हे विषय कधीच लावून धरलेले नाहीत, कॅबिनेटची बैठक होते त्यावेळी हे झोपा काढत असतात त्यांनी आता तोंड सांभाळून बोलावे आपण अधिक खोलात गेलो तर त्यांना जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही,” असा शिवसेना स्टाईलने इशारा भाजपमधून शिवसेनेत गेलेले माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिला आहे.
शिवबंधन बांधल्यानंतर उन्मेष पाटिलांची पत्रकार पहिलीच परिषद
भाजपा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आज दिनांक १० रोजी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, महिला महानगरध्यक्ष गायत्री सोनवणे, विराज कावडिया उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या धोरणामुळे सचिव अडचणीत
जळगाव जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायट्या तर्फे कर्ज देण्याबाबत जे धोरण आखण्यात आले आहे. त्यावर त्यांनी टीका केली. गटसचिवांना दोष देवून त्यांच्यावर बँकेमार्फत अन्याय केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या या धोरणामुळे आज शेतकरी व गटसचिवांना आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
सत्तेच श्रेय घेता मग जबाबदारी पण घ्या
जिल्हा बँकेत फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता आणल्याचे श्रेय गिरीश महाजन घेत आहेत. मग त्यांनी आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी देखील घ्यावी जिल्ह्यातील २१ हजार शेतकरी आणि साडेतीनशे गटसचिवांचा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.










