भडगाव (वार्ताहर)- भडगाव तालुक्यातील गिरड शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एक डंपरला महसूल विभागाच्या पथकाने दिनांक ८ एप्रिल रोजी रात्री गस्तीवर असताना पकडले अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर क्र. एम.एच. ४६ ब.एफ. ५७१८ सदर डंपर हे भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती टोणगाव येथील कार्यरत असलेले तलाठी राहुल पवार यांनी दिली आहे.
महसूल विभागाच्या पथकात तलाठी अविनाश जंजाळे, विजय पाटील, लोकेश महाजन, वाहनचालक लोकेश वाघ सह आदींचा समावेश होता.भडगाव शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गिरणा नदीपात्रातून रात्रभर अवैध वाळूवाहतूक होत आहे.भडगाव महसूल विभागाच्या वतीने अवैध वाळूवाहतूक कारवाई निरंतर सुरूच राहील असे संपुर्ण टिमच्या वतीने तलाठी राहुल पवार यांनी सांगितले










