मुंबई – कपिल शर्माच्या कॉमेडि टीव्ही शोमध्ये काम देतो, असं सांगून २६ वर्षीय युवतीला मुंबईत घेऊन जात, तिचा विश्वास संपादन करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील नालासोपाऱ्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान युवतीने याप्रकरणी आवाज उठवू नये म्हणून आरोपीने युवतीला मारहाण करत धमकी दिल्याची देखील माहिती समोर आली आहे.या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आनंद सिंह असं आरोपीचं नाव आहे.
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
मायानगरी मुंबईत येऊन चंदेरी दुनियेत आपलं स्वप्न साकार करण्याच्या मोहात अनेक तरुण-तरुणी असतात हेच हेरून काही गैरफायदा घेणाऱ्यांची टोळी देखील नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.आपले नशीब आजमiवण्यासाठी अनेकजण मुंबईत येतात मात्र बऱ्याचदा त्यांचा विश्वासघात होतांना दिसतो.दरम्यान फसवणूक झालेली युवती गुजरातच्या सूरत येथील 26 वर्षीय विवाहिता आहे. तीला आरोपीने मुंबईत कपिल शर्माच्या शो मध्ये कामं देतो असल्याचं सांगून आणलं मात्र तीच्या सोबतच भलतंच कांड केलं.
माझी मुंबईत खूप ओळख आहे. तुला सिनेसृष्टीत काम देतो. कपील शर्माच्या शोमध्ये काम देतो, असं आरोपी आनंद सिंह याने पीडित महिलेला आमिष दाखवलं. आरोपी तिला सूरतहून नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील घरी घेऊन आला. 20 मे रोजी रात्री त्याने पीडित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी तिने नकार देताच तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास ठार करेन अशी धमकी देखील आरोपी आनंद सिंहने पीडित महिलेला दिली. पीडित महिलेने न घाबरता तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली. तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी या घटने प्रकरणी तपास सुरु केला आहे.










