जळगाव,(प्रतिनिधी)- आज महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार श्रीमती स्मिताताई उदय वाघ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपली राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस व हजारोंच्या संख्येत असलेल्या मतदारांच्या व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने उमेदवारीचा अर्ज दाखल केला.यानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शनाची रॅली चे आयोजन महायुतीकडून करण्यात आले. सकाळी अकरा वाजता भाजपा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी त्यांना साथ देण्यासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदारराजा हजारोंच्या संख्येने महाविजय रथयात्रेत सहभागी झाला.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल दादा पाटील, माननीय आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेशदादा चव्हाण, यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.










